


कराड -पारगाव खंडाळा येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती व बॅडमिंटन स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथील दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पारगाव खंडाळा येथे शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच झाल्या.या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ग्रीक रोमन प्रकारात प्रणव उद्धव पाटील याने ११० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुमारी जुईली अजित घोरपडे हिने शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या बॅडमिंटन जिल्हास्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा एन एच जाधव यांनी मार्गदर्शन केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी, मा. अल्ताफहुसेन मुल्ला साहेब, संस्था सदस्य अरुण पाटील (काका)प्राचार्य, डॉ एस आर सरोदे, उपप्राचार्य आर. ए. कांबळे, पर्यवेक्षिका एस एस मधाळे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.













