Home महाराष्ट्र वारकरी भवन व बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न

वारकरी भवन व बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न

48

 

मंगळवेढा – तालुक्यातील डोंगरगावाचे सुपुत्र कवी लेखक गीतकार संतसाहित्याचे अभ्यासक डॉ लक्ष्मण हेंबाडे लिखित बोल विठ्ठला विठ्ठला या गीताचा व वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा सत्र न्यायाधीश ह भ प विठ्ठलदादा वासकर प्रमुख पाहुणे गोपाळआण्णा वासकर महाराज सुधाकर इंगळे भागवत चवरे महाराज बबनराव आवताडे प्रदीप खांडेकर विष्णूपंत आवताडे गिरीश वाघमारे सिध्देश्वर आवताडे निवेदक रानकवी जगदीप वनशिव गायक संगीत वैभव केंगार कवी अनिल केंगार चोखामेळानगर ग्रा पं सरपंच शिवाजी सरगर पार्वती आवताडे ज्ञानेश्वर माऊली भगरे राजेंद्र गोरे प्रविण उघाडे अखिल भाविक वारकरी मंडळ वारी परिवार उपसरपंच सर्व सदस्य समस्त गावकरी संत चोखामेळानगर यांची प्रमुख उपस्थिती होती
बोल विठ्ठला विठ्ठला या गीताने ग्रामस्थ रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले मनामनात गहिवरून आलेले दिसले संत चोखामेळा यांच्या संतसाहित्याचे दर्शन घडविणारे डॉ लक्ष्मण हेंबाडे या़ंच्या गीतांमध्ये दिसून आले
आमदार समाधान दादा आवताडे म्हणाले पंढरपूर ही देवभूमी मंगळवेढा ही संतांची भूमी आहे संत चोखामेळा यांचे लवकरच स्मारक होईल वारकरी संप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे मठांचा जीर्णोद्धार तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशी ग्वाही दिली
भागवत चवरे महाराज म्हणाले चंद्रभागेच्या जलशुद्धीकरण व्हावे शुध्द निर्मळ तीर्थ पिण्यास उपलब्ध व्हावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून त्याचा पाठपुरावा करत आहोत पत्रकार हे खुर्चीवर नाही जमिनीवर बसून बातमी लेखन करतात ती उर्जा उर्मी संत चोखोबांच्या भूमिची महती जपणारी असून सोज्वळ संताची संगत सांगणारी आहे असे प्रतिपादन केले अनेक मान्यवरांनी आपली मते विचार प्रगट केले असून मान्यवरांचे श्रीफळ पुष्पगुच्छ वारकरी पंचा देवून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी बहारदार दमदार आवाजात यांनी केले.
मंगळवेढा मधील ग्रामपंचायत संत चोखामेळानगर येथील नव्या वारकरी भवना़त कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here