Home चंद्रपूर शिक्षकांच्या विविध समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-आमदार बंटी भांगडिया.

शिक्षकांच्या विविध समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-आमदार बंटी भांगडिया.

103

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

 

 

चिमूर -चिमूर विधानसभा क्षेत्रात राजकारण सह समाजकारण करीत असताना विरोधक मात्र शिक्षण व्यवस्था नसल्याचा कांगावा करीत आहेत. शिक्षण व्यवस्था मधून आपणास लूट करायचे नाही. चिमूर क्षेत्रातील गोर गरीब सामान्य विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण व्यवस्था सुरु करण्याचा विचार मंथन सुरू आहे. मोफत शिक्षण व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असून सोबत असल्याचे शेवटी सांगितले.

माजी राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांच्या जन्म दिनाच्या औचित्य साधून शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी मंचावर भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, गांधी शिक्षण सेवा समिती अध्यक्ष डॉ दिपक यावले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश पोहनकर, निलम राचलवार, भाष्कर बावणकर, कृष्णाजी तेजने, प्रा. खंगार, माजी प्राचार्य सुधीर पोहनकर, दिगंबरराव खलोरे गुरुजी, सेवानिवृत्त प्रा. महादेवराव पिसे, प्राचार्य निशीकांत मेहरकुरे, माजी प्राचार्य धम्मानी, प्रा संजय पिठाडे, शिक्षण विस्तार अधिकारी महल्ले, एच.एम. पेंडके मॅडम, विनोद गेडाम, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौं मायाताई नन्नावरे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप शिक्षक आघाडीचे एकनाथ थुटे यांनी शिक्षकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी आमदार बंटी भांगडिया सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा सह विविध योजनेतुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. शिक्षकाना दिलेला शब्द पूर्ण करणारे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या सोबत राहण्याची विनंती केली आहे.

दरम्यान शिवाजी पब्लिक जुनिअर कॉलेज व श्री साई सायन्स जुनिअर कॉलेज भिसी च्या वतीने आमदार भांगडिया यांना भेट वस्तू त्यांचा सत्कार करीत गौरव करण्यात आला. तसेच आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर तालुक्यातील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित शिक्षकाना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.
दरम्यान प्राचार्य निशिकांत मेहरकुरे, प्रा. खंगार, सौ. अर्चना भोयर, डॉ. दिपक यावले यांनी मार्गदर्शन केले.

संचालन परमानंद बोरकर तर प्रास्ताविक एकनाथ थुटे यांनी केले. आभार अजहर शेख यांनी मानले. तालुक्यातील मोठया संख्येने शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here