मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल श्री.सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ताधारी नेत्यांच्या बेताल वक्तव्याची तक्रार केली. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री.राहुलजी गांधी यांना भाजप नेत्यांकडून वारंवार धमकी दिली जात आहे. धमकी देणाऱ्यांना अटक करून संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून यावेळी सरकार कडून हिंदू- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम सुरु असल्याची तक्रार ही करण्यात आली.
या शिष्टमंडळात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विरोधी पक्ष नेते श्री.विजय वडेट्टीवार, श्री.बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते उपस्थित होते.