Home यवतमाळ ढाणकी येथे गणेश मुर्तीची तोडफोड करुन विटबंना करणाऱ्या तेरा आरोपीला अटक

ढाणकी येथे गणेश मुर्तीची तोडफोड करुन विटबंना करणाऱ्या तेरा आरोपीला अटक

447

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक १९ सप्टेंबर)
काल दिनांक १७ सप्टेंबर२०२४ रोजी स.पो.नि. प्रेमकुमार केदार ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगाव यांना मिळालेल्या माहिती वरून छत्रपती संभाजी चौक ढाणकी येथे आरोपींनी गणेश मुर्तीची तोडफोड केली व बालगणेश मंडळातील नामे यश माधव कुबडे यास बडग्याने मारहाण करुन जखमी केले व जिवाने मारण्याची धमकी दिली व गणेश मुर्तीची विटबंना केली. त्यावेळी जखमीने आरडा ओरड केल्याने वरिल सर्व आरोपी तेथुन पळून गेले.अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील तपासात तेरा आरोपी सर्व रा.ढाणकी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा.कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. हनुमंत गायकवाड उप.वि.पो.अ. उमरखेड, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार स.पो.नि. प्रेमकुमार केदार पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here