Home चंद्रपूर कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात-एकाच दिवशी जिल्ह्यातील 560 स्थळांची स्वच्छता

कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात-एकाच दिवशी जिल्ह्यातील 560 स्थळांची स्वच्छता

125

 

 

चंद्रपुर (प्रतिनिधी) (दिनांक 19 सप्टेंबर)- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधित जिल्यात “स्वच्छता ही सेवा मोहीम “राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रम राबवायचे आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने 19 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक गावात महाश्रमदान मोहीमेचे आयोजन केले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रमदानात लोकांनी सहभाग नोंदवला.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन केंद्र व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधित “स्वच्छता ही सेवा” हे अभियान राबविण्यात येत असुन, अभियानाची “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता” अशी संकल्पना आहे. या अभियानात नागरिकांनी सहभागी होवुन प्रत्येक गावात अभियान राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपुर जिल्ह्यातील गावा गावात श्रमदान मोहिममध्ये शेकडो नागरिक हातात झाडु घेवुन, स्वच्छतेसाठी पुढे आले. गावा गावातील सार्वजनिक ठिकाणे या श्रमदान मोहीमे मधुन स्वच्छ करण्यात आले . या महाश्रमदान मोहीमेत गावक-यांसह अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्यास्वरुपात सहभाग नोंदवला. जिल्ह्यात ठिक ठिकाणी महाश्रमदान मोहीमेत चांगला सहभाग मिळाला असुन, चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात श्रमदान करुन, गावा गावतील शेकडो हातांनी परिसर स्वच्छ केला असुन, या उपक्रमातुन एकाच दिवशी चंद्रपुर जिल्ह्यातील 560 स्थळांची स्वच्छता करण्यात आली.
—————-
चंद्रपुर जिल्ह्यात महाश्रमदान मोहीम मोठ्या स्वरुपात जनतेच्या सहका-याने राबविता आली. यातुन जिल्ह्यातील गावा गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करता आला. याच बरोबर स्वच्छता सेवा मोहीमे मधिल सर्व उपक्रम प्रत्येक गावात यशस्वी करा.-विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपुर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here