नागपूर -आगामी काळात होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस अनुसूचित जाती नागपूर विभागीय आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांच्या अध्यक्षतेखाली तथा प्रदेश उपाध्यक्ष मा. राजेश लाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
डॉ. हत्तीअंबिरे अध्यक्षीय भाषण देते वेळी म्हणाले, राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. काँग्रेस पक्षास पोषक वातावरण असून मतदार हे आपल्या पक्षासोबत आहेत. काँग्रेस पक्षच जनतेला योग्य न्याय देवू शकतो. विदर्भात अनुसूचित जाती विभागाचे कार्य अतिशय सुरेख पध्दतीने सुरु आहे. पूढेही नियोजनबध्द पध्दतीने व्हावे या करिता कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात राहा असे आव्हान करण्यात आले.
याप्रसंगी अश्विनीताई खोब्रागडे, विनयबोधि डोंगरे, दिनेश वाघमारे, अर्चनाताई बदोले, नागपूर जिल्हाध्यक्ष राहुल घरडे, शहर अध्यक्ष रुपराज गौरी, भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष अनिल दहिवले, वर्धा जिल्हाध्यक्ष ज्वलंत मून यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्याचा व पक्षाचा प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष राजेश लाडे यांनी सादर केला तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. जयंत जांभूळकर यांनी केले तर आभार प्रर्दशन अॅड. गौतमी नारनवरे यांनी केले.
कार्यक्रमाला संगीताताई, गौतम अंबादे, दीपा गावंडे, गोपाल राजवाडे, नैना झाडे, विद्या देशभ्रतार, धनविजयजी, मेश्राम सर, अभिजीत सांगोळे व काँग्रेस पदाधिकारी, जिल्हाधिकारी एवं शहर, विधानसभा, तालुका पदाधिकारी मोठ्या संस्खेने उपस्थित होते.