Home चंद्रपूर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2’ स्पर्धेत ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय...

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2’ स्पर्धेत ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी जिल्हास्तरावर प्रथम

338

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2’ हे अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता राबविण्यात येत असून या अभियानात ने. भै. हि. शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरीने जिल्हा स्तरावर प्रथम स्थान पटकावला असून विभाग स्तरावरील मूल्यांकन नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचे अध्यक्षतेत पूर्ण झाले आहे.

पूर्व विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ब्रम्हपुरीची ओळख निर्माण करण्यात नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था ब्रम्हपुरी तसेच या संस्थे अंतर्गत 1941 मध्ये स्थापन झालेल्या नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय,ब्रम्हपुरीचा अतिशय मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, शालेय प्रशासनाचे बळकटीकरण व शैक्षणिक संपादणूक या घटकांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2’ या अभियानात संस्थेचे सचिव अशोक भैया यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य के. एम. नाईक व पर्यवेक्षक ए. डब्ल्यू. नाकाडे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयाने सहभाग घेत डिजिटल शाळा ,पायाभूत सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक6 प्रगती व व्यक्तिमत्व विकास, अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परसबाग विकास, स्वयंम पोर्टल, विद्यांजली पोर्टल, एन. एस. क्यू. एफ., एच. पी. सी., भाषा प्रयोगशाळा, आरोग्य तपासणी, आपत्ती व्यवस्थापन, इको क्लब, क्रीडा सुविधा, शैक्षणिक साधनसामग्री, महावाचन, आनंददायी शनिवार, स्वच्छता, स्पर्धा परीक्षा, भाषा विषयक क्षमता अशा अनेकविध घटकांवर उत्कृष्ट काम केल्यामुळे विद्यालयाने चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विद्यालयाच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, उपाध्यक्ष अँड.प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, सहसचिव अँड. भास्करराव उराडे, कोषाध्यक्ष राकेश कऱ्हाडे, जेष्ठ सदस्य प्रा. सुभाष बजाज, जेष्ठ सदस्य प्रा. जी. एन. केला, सदस्य गौरव भैया तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

विशेष म्हणजे मागील वर्षी तालुका स्तरावर प्रथम व यावर्षी जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय,ब्रम्हपुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. आर. जिभकाटे, डॉ. पी. एन. बेंदेवार, डॉ. व्ही. एम.करंबे, व्ही. एन. वदनलवार, जे. पी. पराते, जे. एस. बारापात्रे, एन.एस बोरकर, एम.टी. गायकवाड, व्ही.व्ही.धांडे, ए. टी. बोधे, ए. बी. कानझोडे, एन. के. दोनाडकर, एम.जी. उराडे, एल.जी मेश्राम,जी.एस.सिंधीमेश्राम,एम.पी.कळंबे,आर.एम.गावतुरे, एस.वाय. कलकोटवार, एम. एम. कापगते, व्ही. एच. सातपुते, पी.एम.देशमुख, टी. के. बालपांडे, बी.वाय. चांदेकर, बी. एन. मेश्राम, डब्लू. वाय. जेंगठे, एस. आर. कुथे, केशव बोदेले तसेच सर्व शिक्षकवृंद, प्रशासकीय कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here