Home महाराष्ट्र
16

 

मुखेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली.
या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सिताराम येचुरी यांना आदरांजली वाहण्यात आली. तदनंतर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर, उपाध्यक्ष विठ्ठल कल्याणपाड, सचिव ॲड. रणजित जामखेडकर, कोषाध्यक्ष रवी सोनकांबळे, सहसचिव आसद बल्खी, सल्लागार जयभीम सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे उंद्रीकर आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना बढती देत त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे तर मार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डी टी आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा जाणूनबुजून पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत धमकवण्यात येते. अशावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असून पत्रकारांच्या कुटुंबीयांचे आरोग्यविषयक व शैक्षणिक प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील पत्रकार संघटनेशी जोडणार असून त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले तर नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी मुखेडच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भीड पत्रकार तथा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी तर आभार आसद बल्खी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here