पुसद – आपल्या सर्वांच्या आवडत्या आकाशवाणी मध्ये नेहमी वेग वेगळे कार्यक्रमाचे प्रसारण होत असते. त्याच अनुषंगाने 16 सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबी निमित्याने महाराष्ट्रातिल मराठी बांधवांना प्रेषित मोहम्मद स.स यांचा परिचय होण्यासाठी आकाशवाणी केंद्र यवतमाळद्वारे प्रेषित परिचय कार्यक्रमासाठी पुसदच्या सैय्यद सलमान सैय्यद शेरू सरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मानवतेचे प्रणेते प्रेषित मोहम्मद स.स या विषयावर सैय्यद सलमान सरांनी प्रेषित मोहम्मद स.स साहेबांचे जिवन चरित्र मराठी भाषेत थोडक्यात उत्कृष्ट प्रस्तुत केले. तसेच प्रेषित मुहम्मद स.स हे फक्त मुस्लिम समाजाचे प्रेषित नसून अखिल मानवजातीचे प्रेषित आणि आदर्श मार्गदर्शक आहे.आणि आजच्या काळात प्रेषितांची नैतिक शिकवणीची आज गरज आहे तसेच प्रेषित, मार्गदर्शक, महापुरुष हे सर्वांसाठी असतात त्यांना कोणत्याही एका समाजाचे समजणे चुकीचे ठरते. अश्या प्रकारचे व्याख्यान प्रस्तुत केले व त्याची रेकॉर्डिंग करण्यात आली असून ती सोमवारी सोळा तारखेला प्रसारित करण्यात येईल .तरी सर्वानी ती ऐकावी. विशेष म्हणजे सलमान सरांनी यापूर्वी सुद्धा आकाशवाणी केंद्र यवतमाळ मध्ये कार्यक्रम केला होता .आणि सरांचे नेहमी मराठी भाषेत व्याख्यान मार्गदर्शन, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरूच असते.