Home चंद्रपूर शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

111

 

चंद्रपूर -सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय दिनांक 12 सप्टेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयाच्या स्थापना दिवस आणि स्वर्गीय श्री छोटू भाई पटेल यांच्या 102 व्या जयंतीचा सुवर्ण मध्य साधत ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
“स्वच्छ चंद्रपूर सामायिक कर्तव्य किंवा व्यक्तिगत जबाबदारी” या विषयावर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. सद्य परिस्थितीत स्वच्छ परिसर ही काळाची गरज बनलेली आहे . विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेची जबाबदारी बिंबविण्याच्या हेतूने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी या वक्तृत्व स्पर्धेची गरज आणि महत्त्व याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील एलएलबी पाचव्या सत्रातील विद्यार्थी अजाज खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सरोज कुमार दत्ता , डॉ. सुबोध मेश्राम डॉ. मनीषा आवळे डॉ. पुरूनेंदू कार, डॉ. पंकज काकडे व डॉ सुवर्णा मंगरूळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here