बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद -तालुक्यातील मांडवा शांतीधामात लोकसहभागातुन गेल्या वर्षी अवघ्या एका आठवड्यात अंत्यविधी शेड दुरूस्तीसाठी दोन टिनपत्रे देऊन सुरुवात करणारे स्वराज्य गणेश मंडळ यांनी दि.१२ सप्टेंबर २०२४रोजी दंतरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले.
या शिबिराकरिता पुसद येथील तज्ञ डॉ. सीमा पाटील यांचे दंत रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये दात किडलेले असेल, दात दुखत असेल, दात पाडणे, तोंडाचा घाण वास अशा विविध दंतरोग विषयक समस्या बाबत तपासणी करण्यात आली. यामध्ये ११०शिबिरार्थीनी लाभ घेतला.
यावेळी स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर धाड, उपाध्यक्ष गजनान आबाळ, सचिव कार्तिक धाड व तसेच सर्व पदाधिकारी मंडळी आणि सदस्य मंडळी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .