Home गडचिरोली सरपंच संघटनेच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते नाम.विजय वडेट्टीवार यांना निवेदन

सरपंच संघटनेच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते नाम.विजय वडेट्टीवार यांना निवेदन

119

 

गडचिरोली- जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार श्री विजय भाऊ वडेट्टीवार साहेब यांना निवेदन देण्यात आले.

15 लाखापर्यंतचे कामे करण्याचे अधिकार पूर्वरत ग्रामपंचायतला देण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद मार्फत दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून होणारे ओपन टेंडर कामे थांबविण्याबाबत मागणी निवेदन करण्यात आले.

ग्रामपंचायतीला 15 लाखाचे काम करण्याचे अधिकार न्यायालयाच्या निर्णया अगोदर होते, परंतु ते अधिकार ग्रामपंचायत कडून काढून टाकण्यात आले आहे.
त्यामुळे सरपंच पद नाममात्र होते की, काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी सरपंच संघटनेच्या वतीने विनंती होत आहे की, 15 लाखा पर्यंतचे काम करण्याचे अधिकार ग्रामपंचायतला प्रदान करून देण्याचे करावे.
तसेच जिल्हा परिषद गडचिरोली कडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून 3 लाखावरील सर्व कामे ओपन टेंडर करणार आहेत. तरी त्या कामाचे ओपन टेंडर थांबविण्यात यावे.असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार श्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सौ अपर्णा राऊत, जिल्हा उपाध्यक्ष श्री संदीप वरखडे, जिल्हा सचिव श्री पुरुषोत्तम बावणे, सदस्य श्री संजय गावडे, श्री चेतन सूरपाम, आदि सरपंच संघटनेचे सरपंच उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here