रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986
भंडारा : भंडारा न्यूज मीडिया टीम आणि परिवारातर्फे नवीन मराठी म्युझिक व्हिडिओचा स्क्रिनिंग शुभारंभ दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता साई प्लाझा भंडारा येथे आयोजित करण्यात आला. आरोही मोशन पिक्चर्स प्रस्तुत तथा चैताली स्टुडिओच्या पुढाकाराने नुकतेच भंडारा जिल्ह्यातील कलावंतांना सोबत घेऊन ‘आवडता बाप्पा माझा’ या मराठी गाण्याचा सादरीकरण करण्यात आला.
यात परी नावाची एक मुलगी व तीचे पालक असे पात्र दाखविण्यात आले आहे. त्यात परीची किडनी फेल झाली आहे असे डॉक्टर कडून पालकांना बोलावून सांगितल्या जाते. परंतु घाबरायची गरज नाही डायलीसिस करून आपण त्याला ठीक करू शकतो असा विश्वास डॉक्टर कडून पालकांना दिला जातो.
या चित्रफित मध्ये पालकांचा आणि मुलीचा बाप्पा वरती असणारा विश्वास दाखविण्यात आला आहे. या निमित्ताने गाण्याच्या प्रमोशन करिता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रशांत पडोळे, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजूभाऊ कारेमोरे हे उपस्थित होते. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. हे गाणं भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी बघावे असे आवाहन आरोही मोशन पिक्चर्स तथा चैताली स्टुडिओचे डायरेक्टर राविल विमल रामटेके यांनी केले आहे.