*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : रामोशी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दादा बोडरे यांनी नुकत्याच 5 सप्टेंबर 2024 रोजी सातारा जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबत निवेदन दिले होते. सदर निवेदनाची दखल घेत, दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कलेक्टर महोदयांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उमाजी राजे नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत आदेश पारित केला आहे .
राजेंद्रदादा बोडरे यांच्या रामोशी ब्रिगेड संघटनेद्वारे रामोशी समाजाच्या विविध विषयांवर नेहमीच आवाज उठवला जात असतो. त्यातच रामोशी समाजाचे महापुरुष आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत नसल्याचे त्यांनी आपल्या संघटने द्वारे जिल्हा कलेक्टर साहेब सातारा यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते. तसेच उमाजी राजे नाईकांची जयंती सर्व शासकीय कार्यालयामध्ये होण्यासंदर्भात मागणी केली होती. रामोशी ब्रिगेड या संघटनेच्या या मागणीला अवघ्या दोन दिवसात दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उमाजी राजे नाईकांची जयंती साजरी करण्याबाबत जिल्हा कलेक्टर साहेबांनी आदेश पारित केले आहेत.
राजेंद्रदादा बोडरे यांच्या रामोशी ब्रिगेड या संघटनेच्या या कृतीला समाजातून भरभरून शाबासकीची थाप मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातून रामोशी ब्रिगेड संघटनेचे कौतुक होत आहे. रामोशी समाजामध्ये एकूणच या घटनेने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कष्टकरी, कणखर व प्रामाणिक समजला जाणारा रामोशी समाज, आपल्या महापुरुषाच्या या कौतुक सोहळ्यामुळे नुकताच सुखावल्याचे चित्र अवघ्या सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे.
सदर यशाबद्दल राजेंद्रदादा बोडरे यांच्या रामोशी ब्रिगेड संघटनेचे संघटनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते इम्तियाज नदाफ, ऍड. राजू भोसले, वडूजचे नगरसेवक तुषार तात्या बैले, प्राध्यापक धनंजय ओंबासे, डॉक्टर सचिन साळुंखे, डॉक्टर प्रसाद ओंबासे, सत्यवान कमाने, महेश दादा करचे, बाळराजे विरकर, बी आर एस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासो गोरड, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे वडूजचे मोहम्मद शरीफ आतार, तसेच फलटणचे हाजी निजामभाई आतार, आंधळी ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात, मोगराळे उपसरपंच अमोल भोसले, अण्णासो मगर, धर्मराज जगदाळे, किरण कदम इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.