Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा

71

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ. दादासाहेब सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा, मानसशास्त्र विभाग, मानसमित्र समुपदेशक केंद्र व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ०५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी मानवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे, कार्यक्रमाचे उदघाटक उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस.आर.देवरे, डॉ.डी.पी सपकाळे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.आर. पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. आर. पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कु. दीप्ती वाणी, कु.गायत्री पाटील, कु. मोहिनी महाजन, कु.जयश्री बारेला, कु नेहा पाटील,कु वैष्णवी माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ के.एन. सोनवणे सर यांनी शिक्षकाचे समाजातील स्थान, महत्व तसेच जबाबदारी व भूमिका काय असते हे विविध उदाहरणातून शिक्षक दिनाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती पाटील तर आभार प्रदर्शन डॉ. मुकेश बी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. डी.एस. पाटील, डॉ. ए. एच. साळुंके, बी.एच. देवरे, संदीप पाटील, चेतन बाविस्कर कु.विजय नागदेव, घनश्याम माळी व मानसमित्र केंद्राचे सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here