Home महाराष्ट्र संविधानाद्वारे भारताचा आदर्श नागरिक बनावे-एस के भंडारे समता सैनिक दलाचा राज्यस्तरीय...

संविधानाद्वारे भारताचा आदर्श नागरिक बनावे-एस के भंडारे समता सैनिक दलाचा राज्यस्तरीय समता फोर्स कॅम्प सुरु -समारोप डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते होणार

134

 

 

सांगली(दि.1/9/2024) – भारतीय संविधातील न्याय, स्वतंत्रता, समता, बंधुता या चार सूत्रां आधारातीत नवीन आदर्श भारतीय नागरिक बना व बनवण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन करून संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आणि जननी आहेत असे संविधान सभेतील मान्यवरांनी सांगितले असल्याची माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी, समता सैनिक दलाच्या दि 1/9/2024 ते 7/9/2024 पर्यंत पंचशील करिअर अकॅडमी, पलूस (जि. सांगली ) येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समता फोर्स कॅम्प च्या दि 1/9/2024 रोजीच्या उदघाटन प्रसंगी दिली.

प्रथम एस के भंडारे आणि पंचशील करिअर अकॅडमी चे संस्थापक व संचालक हिम्मत होवाळ (आर्मी रिटायर्ड ) यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण केले. एस के भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कॅम्पमध्ये एस के भंडारे, हिम्मत होवाळ, अँड डॉ एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव /केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व असि. स्टाफ ऑफिसर ), अशोक कदम ( असि. स्टाफ ऑफिसर ), दादासाहेब भोसले (असि. स्टाफ ऑफिसर ), डी एम आचार्य (हेडक्वार्टर सचिव व असि. लेफ्टनंट जनरल ), पी एस ढवळे (असि. लेफ्टनंट जनरल ), उमेश बागुल ( असि. लेफ्टनंट जनरल ), व्हि.डी. हिवराळे ( मेजर जनरल ), मोहन सावंत ( हेडक्वार्टर उप सचिव व लेफ्टनंट कर्नल ),रविंद्र इंगळे ( सचिव, महाराष्ट्र राज्य व लेफ्टनंट कर्नल ), रुपेश तामगांवकर (मेजर व जिल्हा अध्यक्ष सांगली पूर्व ) हे अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील मुंबई,रायगड,पुणे, सांगली,कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, वाशीम, जालना या जिल्ह्यातून समता सैनिक दलाचे 51अधिकारी व सैनिक सहभागी झाले आहेत.या शिबिरासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सांगली पश्चिम जिल्हा शाखा अध्यक्ष रविंद्र लोंढे यांनी कॅम्प मधील शिबिरार्थीना वह्या, पेन दिले.

या समता सैनिक दलाच्या समता फोर्स कॅम्पचा समारोप व पंचशील करिअर अकॅडमीचा रक्तदान शिबीर दि 7/9/2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल ) यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया /समता सैनिक दलाचे सांगली पूर्व आणि पश्चिम जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,दलाचे अधिकारी / सैनिक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here