चिमूर -आमदार बंटी भांगडिया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून चिमूर तालुक्यांतील विविध गावातील महिलांचा आमदार बंटी भांगडिया यांच्या नविन वाड्यात भाजपाचा दुपट्टा टाकून प्रवेश केला.
वंचीत बहुजन आघाडीच्या माजी तालुका अध्यक्ष बबिता रमेश गेडाम, अंजली देवराव मेश्रान जांभूळघाट, कुसूम सुदर्शन सातपुते महीला मंडळ अध्यक्ष, ममता अनिल मेश्राम मेटेपार, सोनाबाई दिगांबर लांडे आंबेनेरी, बेबी भाऊजी टेकाम कोटगाव, शेवंता प्राण खापर्डे कोटगाव, शालू जगदीश झाडे, सविता नागोराव शिवरकर चिमूर, या महिलांनी भाजपाचा प्रवेश केला.
यावेळी भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनीष तुम्पल्लीवर, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, एकनाथ थुटे, घनःश्याम डुकरे,भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गीताताई लिंगायत, संजय नवघडे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री आशा मेश्राम आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.