Home महाराष्ट्र कठोर परिश्रम हाच यशाचा मुलमंत्र – डॉ. टिपरसे 🔹गंगाखेडला यशवंत विद्यार्थ्यांचा...

कठोर परिश्रम हाच यशाचा मुलमंत्र – डॉ. टिपरसे 🔹गंगाखेडला यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव

64

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड : येथील यशवंत स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या २३ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिपक टिपरसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिक्षणाधिकारी विकास कुकडे, उपशिक्षणाधिकारी अजित तरवटे यांची प्रमुख ऊपस्थिती होती. कठोर परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र असून यश मिळवण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, असे प्रतिपादन डॉ. टिपरसे यांनी या प्रसंगी बोलताना केले.

संयोजक तथा मार्गदर्शन केंद्राचे संचालक बालासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सोपान बाबर सर, शरद निरस, कदम सर,राजू चिंचोलकर, आबासाहेब शिंदे, चक्रधर शिंदे, रामेश्वर लोखंडे, अंबादास लोखंडे, हिरामण रॅपल, राजकुमार तिगोटे जळकोटकर सर, मुंडे सर आदिंसह सर्व गौरवमुर्तींची या प्रसंगी ऊपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here