Home लेख वाहन विकत घेताना आपण रोड टॅक्स का भरतो?

वाहन विकत घेताना आपण रोड टॅक्स का भरतो?

89

 

 

 

सध्या पावसाळा सुरु आहे. शहरा पासून गांव पर्यन्त रोडवरील खड्डे. वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही कसरत करीत असतांना नजर चुकीने खड्यात पडला तर त्याला वाहतूक विभाग किंवा महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभागाशी काही संबंध नाही. देशात एकूण 33.705 किलोमीटर लांबीचे 10088 राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक राज्य महामार्ग आहेत. राज्य महामार्ग हे राज्याचे धमनी मार्ग आहेत, जे तालुका ते जिल्हा मुख्यालये आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडतात आणि त्यांना राष्ट्रीय महामार्ग किंवा शेजारच्या राज्यांच्या महामार्गांशी जोडतात. या सर्व राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाचे काम राज्य केंद्र सरकार स्वता करीत नाही. त्याचे ठरलेले शासकीय ठेकेदार कंपन्या असतात. यावर देखरेख ठेवण्याचे काम पी डब्ल्यू डी इंजिनियर करीत असतात. पण रस्त्यावर खड्डे पडले तर त्यांची जबाबदारी त्यांची नसते. किंवा सरकारची ही नसते. त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही. सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत. सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील सार्वजनिक योजनेतील आर्थिक टक्केवारी घेऊन वर बोट दाखविण्याचे काम करीत असतात. आज सर्व ओरडतात रोडवर खड्डे पडले पण त्या विरोधात सनदशीर मार्गाने कोणी लढतांना दिसत नाही. निषेध सर्वच करतात.पण कारवाई होते काय?
सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग योजना बनविणार त्यांची अंमलबजावणी कर्मचारी अधिकारी बांधकाम इंजिनियर करणार. रोडवर खड्डे पडले त्याविरोधात वाहनचालक मालक सरकारच्या विरोधात जन आंदोलन करणार? पोलीस त्यांच्यावर बळाचा वापर करणार, आणि आदेशाचे पालन करणार. प्रत्येक नेता आणि शासकीय वाहतूक अधिकारी, वाहतूक पोलिस वेगवेगळा पद्धतीने वाहनचालकाचे आर्थिक शोषण करणार आणि सांगणार सरकारचा आदेश आहे. आम्ही काय करणार?सरकारच्या कोणत्याही खात्यात जा हे ठरलेले उत्तर असते. म्हणूनच सरकारी खाते हे खातेच असते. त्यांचे मालक कर्मचारी अधिकारी पोलिस हेच असतात. यांच्या विरोधात एकटा दुकटा वाहन चालक किंवा मालक संघर्ष करू शकत नाही. त्यासाठी वाहन चालक मालकाची एकजूट म्हणजेच संघटना असायला पाहिजे. आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावी. स्वतंत्र विचारांची असावी. टेम्पो ट्रक मालकाच्या संघटना आहेत. पण बाकी खाजगी फोर व्हीलर मालकांच्या संघटना नाहीत. त्यांना मात्र ज्या दिवशी फोरव्हीलर गाडी विकत घेतली त्याच दिवशी राज्याचा रोड टॅक्स भरावा लागतो. त्याने रोडवर गाडी चालवो अथवा नाही चालवो. म्हणूनच मी विचारतो वाहन विकत घेतांना आपण रोड टॅक्स का भरतो?
आता नवीन समस्याकडे आपले लक्ष वळवितो. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल, हिरो होंडा, यामा, बजाज टू व्हीलर गाड्या आहेत, नोकरी व उद्योग धंदा करणाऱ्यांकडे फोरव्हिलर गाड्या असल्या शिवाय त्यांना समाधान वाटत नाही व ते प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. तर काही कर्मचारी अधिकारी यांना वाहन भत्ता, पेट्रोल अलाऊन्स भेटत असते त्यासाठी गाडी नावावर पाहिजेच असते. त्यामुळे उद्योगपतीचा सरकारचा, पोलिसांचा कायमस्वरूपी उद्योग धंदा सुरू राहतो. आपल्याकडे गाडी आहे म्हणजे आपण कुठे तरी मित्र मंडळी सोबत किंवा कुटुंबा सोबत जाणारच म्हणजेच रोडवर गाडी चालविणे आलेच. त्यामुळेच मग आपणास वाहतुकीचे नियम माहिती असणे बंधनकारक आलेच. आज सर्व ओरडतात, रोडवर खड्डे पडले पण त्या विरोधात सनदशीर मार्गाने कोणी लढतांना दिसत नाही. निषेध सर्वच करतात. पण कारवाई का होत नाही?कारण त्या खड्यातील वाटा स्थानिक नेत्यानी खाल्ला असतो.
वाहन चालक व मालकासाठी सरकारने वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे. हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे, त्यामुळे वाहन चालक आणि पोलिस यामध्ये वाद दररोज कोणत्याना कोणत्या चौकात वाढत आहेत. पण हा दंड सरकारने वाढवला आहे, पोलिसांनी नाही, हे वाहन चालक, मालकांनी लक्षात घेतले पाहिजे, म्हणजे पोलीस वाहन चालकांकडून वाहतूक नियम भंग झाल्यावर जो E-chalan मशीन द्वारे दंड आकारतात तो सरकार जमा होतो, आणि वाहक चालकांकडून वाहतूक नियम भंग झाला की दंड आकरण्याचे काम सरकारने पोलिसांना दिले आहे, त्यामुळे एक तर वाहतूक नियम पाळा. नाहीतर गपचूप दंड भरा, पण आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका,त्या पोलिसांना दिवसभरात आपल्या सारख्या किती तरी वाहनचाकलांना तोंड द्यावे लागते. हा संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि वाहनचालक सर्वत्र पाहायला भेटतो. पोलीस व वाहन चालक दोघांना ही खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठीच सोसायटीत नगरातील, विभागातील वाहन चालक मालकांनी संघटीत झाले पाहिजे. अधिकृतरीत्या संघटना बनविली पाहिजे आणि सनदशीर मार्गाने संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाशी पत्र व्यवहार केला पाहिजे. संघर्षाचा त्रिकोण सरकार, पोलीस आणि वाहनचालक मालक यांचा सनदशीर मार्गाने समस्या सोडविल्या पाहिजेत.
वाहन चालक मालकांनी आपल्याला दंड भरावा लागू नये याकरिता वाहतूक नियम पाळावे
१) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नका.
२) टू व्हीलरवर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घालावे, आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीला ही हेल्मेट घालायला सांगावे. ३) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स,सोबत बाळगावे.
४) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवावा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करून घ्यावा.
५) आपली गाडी शक्यतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका,आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?. ते जबाबदरीने चेक करा.
६) आपल्या टू व्हीलर वर तिसरा व्यक्ती बसवू नका.
७) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे का ते पहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाइन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार,(वाहतूक कोर्ट चे पत्र आपल्या घरी येणार)
८) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका,जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या लायकीचा होत नाही. तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका.
९) गाडी चालवताना सिंगनल तोडून जाऊ नका,प्रत्येक सिंगनल वर कॅमेरा लावलेला असतो.आपल्या वाहनावर सी.सी.टी.व्ही. (CCTV) कॅमेरा मार्फत दंड पडतो.आणि आपल्या गाडी नंबर वरून आपल्या घरच्या पत्यावर (मोटार कोर्टाचे) दंड आकारण्याबाबत पत्र येते.
१०) सिंगनलला झेब्रा क्रॉसिंग वर वाहन थांबवू नका.
११) लाल सिंगनल पडला असता गाडीचा वेग वाढवू नाका. पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवा.
१२) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (wrong side) वाहन नेवू नका.
१३) गाडी नो पार्किंग एरिया किंवा फुटपाथवर पार्क करू नका.पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा.
१४) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्यावे.
१५) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यावी म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडणार याची काळजी घ्यावी.
१६) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोड ने घेऊन जावे.
१७) फोर व्हीलर किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीटबेल्टचा वापर करा.
१८) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडीला लावा.
१९) खाजगी गाड्यावर पोलिस किंवा इतर काही मजकूर लिहू नका.
२०) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे आसने गरजेचे आहे
२१) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका.
२२) फोर व्हीलर ला डार्क काळ्या काचा बसवू नका.गाडीमधील व्यक्ती बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी.
२३) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे.
२४) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवून मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करू नका.आपण जर वरील सर्व नियम आपल्या वाहनांच्या बाबतीत पाळत असाल तर आपल्या हातून कधीही वाहतुक नियमांचा भंग होणार नाही.आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. जर आपण कोणताही नियम मोडला तर वाहतूक पोलिसांना दोष देऊ नका,मुकाट्याने दंड भरा,आणि गप निघून जा,आणि यावेळी दंडाची रक्कम सरकारने बऱ्याच प्रमाणात सरकारने वाढवली आहे,ती रक्कम सामन्य वाहनचालक मालकांना भरणे कठीण वाटते,त्यामुळे आपण आपले वाहन योग्य रीतीने वापरा आणि चालवा.या नियमाचे पालन केले तर आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. रिक्षा चालक मालक, टेम्पो चालक मालक, ट्रक मालकांच्या नोंदणीकृत संघटना असल्यामुळे ते वाहतूक पोलिसांना कधीच घाबरत नाही. कारण त्यांचे मालक संघटित असतात. बाकी फोरव्हीलर वाल्याचे काय ते स्वताच मालक चालक असतात. पण ते संघटित नसतात तर असंघटित असतात.पोलिस त्यांनाच बरोबर हेरतात.
वाहन विकत घेतांना आपण रोड टॅक्स का भरतो? हा वाहन चालक मालकावर अन्याय आहे हे शंभर टक्के सत्य आहे.रोड चांगले नसतील तर त्यासाठी सरकारला ही त्याच पद्धतीने दंड करता येतो.त्यासाठी आपण संघटीत झाले पाहिजे. काय करू शकते संघटना ते डोक्यात ठेवा. रोड कोणत्या खात्याच्या अंतर्गत येता. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ State Public Works Department (PWD) Ministry of Road Transport & Highways, Government of India. मुंबईसह राज्यात ८८ टक्के प्रवासी सार्वजनिक रोड वाहतुकीचा वापर करतात. मुंबईतील बस परिवहन व्यवस्था आहेही भारतात सगळ्या शहरांत सर्वात मोठी आहे. वाहन चालक मालक संघटना युनियन काय करू शकतात. खराब सिग्नल असेल तर सबंधित जबाबदार अधिकारी यांना दहा हजार रुपये दंड, रस्त्यावर खड्डे असल्यास सबंधित जबाबदार अधिकारी यांना वीस हजार रुपये दंड, रोडवर खड्डे खोडून व्यवस्थितपणे बनविले नाही म्हणून सबंधित जबाबदार खड्ड्यात पडून वाहनाचे व वाहन चालकाचे नुकसान झाल्यास अधिकारी यांना दवाखाना व वाहन खर्च अधिक पाच हजार रुपये दंड.असे कायद्यानुसार वाहन चालक आणि मालकांना संघटनेच्या वतीने सरकारच्या या उन्मत्त अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करता येऊ शकते.म्हणूनच त्रिकोणी संघर्ष टाळावा.
राजकारणी राज्यकर्ते आणि सर्वच खात्याचे कर्मचारी अधिकारी वाहन चालक मालकाचे वर बोट दाखवून आर्थिक शोषण ते संघटीतपणे करतात. म्हणूनच आपण ही संघटीत झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना डोळ्यासमोर ठेऊन स्वतंत्र चालक मालक वाहतूक संघटना-संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन मान. रविंद्र सूर्यवंशी यांनी स्थापन केली आहे. त्यांनी वाहतूक संबधित अधिकारी आणि चालक मालक यांच्या अनेक समस्यावर चर्चा करून सोडविले आहेत. “मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही” संघटीत होऊन संघर्ष केला तर यशस्वी होता येतो. म्हणूनच संघर्षाचा त्रिकोण सरकार, पोलीस आणि वाहन चालक मालक हा संघर्ष पत्र व्यवहार करून टाळावा. आज सर्व ओरडतात रोडवर खड्डे पडले पण त्या विरोधात सनदशीर मार्गाने कोणी लढतांना दिसत नाही. निषेध सर्वच करतात. पण कारवाई होते काय? म्हणूनच मी या लेखा द्वारे राज्यातील सर्व फोरव्हीलर गाडी मालकांना चालकांना जाहीर आवाहन करतो. वाहन विकत घेतांना आपण रोड टॅक्स का भरतो?संघटित व्हा नंतर संघर्ष करा. अधिक माहिती साठी संपर्क करावा.

सागर रामभाऊ तायडे,
अध्यक्ष – स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य मो. ९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here