अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-गंगाखेड तालुक्यातील कौडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत धरमनगरी येथील बौद्ध विहारांच्या प्रांगणात (दिनांक 25 ऑगस्ट रविवार) रोजी समाजातील महिलांनी गावच्या पुढार्यांसमोर एक आदर्श निर्माण करीत स्वखर्चाने वृक्षाची लागवड केली.याप्रसंगी उपसरपंच चंद्रशेखर बुट्टे, होनाजी मुंजाजी हाके,नागोराव सावंत, मुंजाजी सावंत यांची उपस्थिती होती. उन्हाळ्यामध्ये आपल्या मुलां बाळांना उन्हाचे चटके न लागावे म्हणून आम्ही लावलेल्या झाडांची सावली आम्हाला जरी नाही भेटली तर येणाऱ्या पिढीला मिळावी म्हणून आज आम्ही सर्व महिलांनी आपल्या बौद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायत अथवा कुठल्याही संस्थेमार्फत आम्ही वृक्षांचे रोपे न घेता स्वखर्चाने रोपे घेऊन आज वृक्ष लागवड केली असल्याचे महिलांनी बोलून दाखवले तसेच प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्याची गरज आज आहे अशी खंतही बोलून दाखवली. या वृक्षारोपणास गोरखनाथ कांबळे, वंदना गोरखनाथ कांबळे, सोमित्राबाई देवकते, शालुबाई टोंप्पे, प्रभावती बालासाहेब सावंत, राधाबाई जगताप, लक्ष्मीबाई सावंत, प्रियंका दशरथ सावंत, बालासाहेब सावंत, दशरथ सावंत, समाधान सावंत, परमेश्वर सावंत, कार्तिक कांबळे आदींनी परीश्रम घेतलें