Home महाराष्ट्र बदलापूर घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा – महाविकास आघाडी म्हसवड...

बदलापूर घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा – महाविकास आघाडी म्हसवड शहर

465

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : बदलापूर येथे चिमूर्डयावर झालेल्या लैंगिक आत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर होत असेलेले आत्याचार यांची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजिनामा द्यावा अशा आशयाचे निवेदन म्हसवड शहर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल यांना देणेत आले यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी येथील. महात्मा फुले चौकात तोंडावर काळ्या फित लावून सर्व घटनाचा निषेध नोंदवला.
राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि महाराष्ट्र मधील महिलांच्या वरील होत चाललेल्या वाढत्या अत्याच्याराला आळा घालण्यात असमर्थ ठरलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे पाईक संबोधून घेतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणाचा विसर पडलेला दिसतोय म्हणून महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाली असल्याचे दिसत आहे. मागिल एकाच महिण्यात मंदिरात तिन पुजाऱ्यानी महिलेवर आत्याचार करून त्या महिलेचा खून केला सातारा जिल्यातील माण तालुक्यातील शिंगणापूर येथे अल्पवयीन मुलीवर आत्याचार करण्यात आला आहे बदलापूर मधील अल्पवयीन विद्यार्थीनीचे शोषण करण्यात आले त्याचा उद्रेक बदलापूरात झाला आहे. महिलांवर होणारे आत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे म्हणून यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी म्हसवड शहर महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपाल यांच्याकडे मागणीचे पत्र देत आहोत आणि बदलापूर घटनेचा जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी माण तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब मदने, माजी नगराध्यक्ष महादेव मासाळ, जयसिह राजेमाने, भीमराव लोखंडे, सचिन माने, कांतीलाल ढाले, शिवाजी केवटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here