(प्रशांत गेडाम, विशेष प्रतिनिधी, 94229 40333)
सिंदेवाही- एससी एसटी कोट्यातील आरक्षण उप वर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण देशात २१ ऑगस्ट २०२४ ला भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते. या बंद मध्ये सिंदेवाही शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होते.
सिंदेवाही तालुका बंद ठेवून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या आंदोलनात आंबेडकरी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या सर्व संघटना, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था सोबतच आदिवासी समाजाच्या सर्व संघटना सहभागी होत.आज (21ऑगस्ट ) दुपारी ३ वाजता सिंदेवाही चे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. व तहसील कार्यालयात काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर आभार प्रदर्शनाने सदर आंदोलनाची सांगता झाली.