आपल्या समाजाला जडलेली मानसिक अस्वस्थता, भावना शून्य ,बेजबाबदार पणा आणि परिणामांची कुठलीही पर्वा न करणे हे तीन कारणे उदासीनता निर्माण करण्यासाठी पुरेशी आहेत. मनुष्य समाजशील प्राणी म्हणून वावरतो परंतु आपल्या सभोवताली वातावरण दुषित करण्यासाठी तोही खूप मोठ्या प्रमाणात वाटेकरी होत चालला आहे. आज समाज व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात तफावत आहे .आज समाजातील काही टक्के लोक विकृत प्रवृतीकडे वळत चाललेला आहे .आज गांभीर्याने न्याय आणि जबाबदार नागरिक ही दोनच मूल्ये समाज व्यवस्थेला सुधारण्यासाठी अतिशय मौल्यवान आहेत.
आज कोलकाताची घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि चिंतेचा विषय होऊन बसला असताना शाळेत अमानवीय कृत्य घडत. अल्पवयीन मुलांवर होणारे लैंगिक छळ हे समाज व्यवस्थेला व न्याय व्यवस्थेला एक चपराक आहे. शाळा ही मुलांचे दुसरे घर समजले जाते आई-वडील आपली मुले ही शाळेत सुरक्षित आहेत या विश्वासाने बाहेर निश्चित असतात परंतु आज शाळा जे विद्येचे घर, ज्ञान मंदिर समजले जाते त्या ठिकाणी सुद्धा असे लांछनास्पद कृत्य घडते.
आज आपल्या मालकी हक्कांची गाडी ही अवैध तर नाही यासाठी रस्ता रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस तैनात असतात की वाहन चालकाकडे लायसन्स आहे की नाही त्यांनी सिटबेल्ट लावला आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी तो सतर्क असतो हे एक उदाहरण म्हणून घेतले परंतु ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात मुले शिक्षण घेतात तिथे यांच्या सुरक्षेतेसाठी कोण उभा आहे ….हा खूप मोठा व चिंतेचा प्रश्न आहे आणि आपण तो प्रश्न नागरिक म्हणून, पालक म्हणून, स्त्री म्हणून विचारायला हवा. आज शाळेत प्रशिक्षण घेतले जाते शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे नवनवीन उपक्रम आयोजिले जातात परंतु सुरक्षेतेचा विषय हा गांभी्याने मांडला जात नाही म्हणूनच हा प्रश्न उदासीनतेला वाव देतो. आज विद्यार्थ्यांना सु…शी.. समजत नाही त्या वयात त्यांना गुड टच बॅट टच धडे शिकवल्या जातात परंतु हे स्पर्श करणाऱ्यांची शाळा मात्र घेतल्या जात नाही सुधारणा करायची आहे तर त्या विकृत मानववृत्तीची. वागायचे आहे जबाबदारीने आणि अन्याय होत असेल तर आवाज उठवायचा आहे आणि ॲक्शन घ्यायची आहे तेव्हाच अशा घटना कमी होण्यास मदत होईल विकृत मानसिकता ही शरीरात होणाऱ्या कॅन्सर प्रमाणे आहे तो झपाट्याने वाढतो व वेळीच उपाय झाला नाही तर तो संपतो म्हणून हा विषय खूप चिंतेचा आहे पुढे विशाल रूप घेण्याआधी योग्य कायदा व शासन व्हायला हवे .
Be Alert …Be Action…. !!
लेखिका-वैशाली रोहनकर आरीकर
(संपादक-बहुजन ललकार चंदपुर)