कराड :(दि. 20, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व संगम ग्रीन क्लब यांच्यावतीने मौजे किवळ ता. कराड येथे 130 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मौजे किवळ येथे वड, पिंपळ, चिंच, करंज, नारळ, सीताफळ, पेरू अशी विविध स्वरूपाची 130 वेगवगेळ्या प्रकारची झाडे लावली.
यावेळी केंद्रीय दिशा समिती नवी दिल्ली च्या सदस्य श्रीमती संगिता साळुंखे (माई) व वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या प्रभारी प्राचार्य श्रीमती डॉ. एस. आर सरोदे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे, डॉ. एन. ए. पाटील, प्रा डॉ. डी. पी. जाधव, प्रा. पी. एस. कराडे, डॉ. ए. बी. मुळीक, प्रा. डॉ. एस एम. चव्हाण , प्रा. एम. एस. बागवान तसेच ग्रीन क्लबचे डॉ. जे. यू. दीक्षित उपस्थित होते. याचबरोबर या कार्यक्रमाला मौजे किवळ येथील श्री सुनिल साळुंखे, बचतगटाच्या महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.