कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंबेडकरी, समाज, पक्ष, संघटना जन आंदोलन आयोजित भारतीय संविधान, आरक्षण आणि आजची परिस्थिती या संदर्भात निवडक प्रतिनिधीची शनिवार दि. 17 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे चिंतन गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे आणि परिषदेचे निमंत्रक, सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर परिषदेला स्वागताध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी यांच्यासह डॉ. गिरीश मोरे (ज्येष्ठ साहित्यिक), डॉ. विजय काळेबाग (ज्येष्ठ विचारवंत), रूपाताई वायदंडे (प. महा. अध्यक्षा, आर.पी.आय.(ए), भारत धोंगडे (दलित महासंघ), ॲड. करुणा विमल (अध्यक्षा, आम्ही भारतीय महिला मंच), चंद्रकांत सूर्यवंशी (निवृत्त कृषी अधिकारी), बाळासाहेब भोसले (प्रमुख, लोक जनशक्ती पार्टी), सुभाष देसाई (अध्यक्ष, ब्लॅक पॅंथर), दिलीप मोहिते (संस्थापक अध्यक्ष, मातंग सेवा संघ), पांडुरंग कांबळे (जिल्हाध्यक्ष, रिपाई, गवई गट), अनंत मांडुकलीकर (साहित्यिक व विचारवंत), ॲड. दत्ताजीराव कवाळे (अध्यक्ष, सिटी क्रि. बार असो.), बाबासाहेब कामत, अर्जुन जाधव (नेते, रिपब्लिकन सेना), विश्वासराव तरटे (अध्यक्ष, दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट), शिवाजीराव आवळे (अध्यक्ष, बंडखोर सेना पक्ष), श्रीकांत कांबळे (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय दलित महासंघ), सतीश लोंढे (प. महा. अध्यक्ष, डेमॅाक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), दादासाहेब माने (अध्यक्ष, बहुजन दलित सेना), सतीश भंडारे (अध्यक्ष, आंबेडकरवादी स्वराज्य पार्टी), विकास बुरुंगले (अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, भटके विमुक्त आघाडी), निलेश महापुरे (संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान), संभाजी कांबळे (जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन), रुपेश आठवले (जिल्हा सचिव, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन), चंद्रकांत काळे (जिल्हाध्यक्ष भारतीय दलित महासंघ), अक्षय साळवी (अध्यक्ष, लहुजी साळवे प्रतिष्ठान), बाळासाहेब कुशाप्पा (नेते, धनगर समाज) आदी मान्यवरांचा मुख्य सहभाग असणार आहे.
सदर परिषदेचे आयोजन कृष्णात भारतीय, प्रताप बाबर, दिलीप कोथळीकर, प्रवीण आजरेकर, अमर कदम, अमर तांदळे, दयानंद कांबळे, सुरेश कांबळे, बाबासाहेब धनगर, कुंडलिक भामटेकर, सर्जेराव भालेकर, केरबा महेकर यांनी केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर परिषदेत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.