✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
यवतमाळ (दि. १४ ऑगस्ट) उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध जुगार व मटका या संदर्भात अनेक वेळा भीम टायगर सेनेचे शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ) यांनी वेळोवेळी निवेदन देऊन सदर करून अवैध धंदे बंद करा. पण पोलीस निरीक्षक यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.
आणि शहरातील व तालुक्यातील अनेक महिलांनी सुद्धा माझ्याकडे तक्रार केली आहे की, आमचे नवरे दिवसभर काम करून रोज मजुरीचे आलेले पैसे जुगार व मटक्यात घालवीत आहे.
म्हणून मी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तक्रार दि.05/08/2022, दि.,13/08/2022, दि.05/09/2023, दि.14/06/2024, दि. 11/07/24 रोजी इत्यादी लेखी तक्रार अर्ज वारंवार दिल्या पण पोलीस निरीक्षक यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर वाढविले.
तरी सुद्धा मी पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांना प्रत्यक्ष भेट घेऊन अवैध धंद्याबद्दल असता पोलीस निरीक्षक यांनी माझ्या विषयाला अनुसरून उत्तर देण्याऐवजी मादरचोदा लय माजला का?, लय मटक्याच्या आणि जुगाराच्या मागे लागला, मला माहित आहे तुझ्या जातीच्या लोकांना काही काम नाही.
खांद्यावर निळे रुमाल टाकून जाता हा तुमचा धंदा झाला. भविष्यात जर पोलीस स्टेशनला जुगार व मटका संबंधाने आला तर तुला एखाद्या खोट्या केस मध्ये अडकून टाकेलं.
चल निघ इथून अशा धमकी दिल्या.
मटका व जुगार चालविणारे लोक हे गुंड प्रवृत्तीचे असून हे पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून माझ्या विरोधात तक्रार देण्यास भाग पाडू शकतता. हा पोलीस निरीक्षक अत्यंत भ्रष्टाचारी असून एकमेव पैसा गोळा करणे हा त्यांचा उद्देश आहे.
मागण्या :- १) पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांची खातीने चौकशी करावी, २) पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांची तात्काळ बदली करावी,
३) पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार व इतरक्रमानुसार भारतीय न्याय सहा नव्हे गुन्हा दाखल करावा,
४) निरीक्षक संजय साळुंके यांचे ऑल कॉल रेकॉर्ड तपासावे.
५) पोलीस निरीक्षक यांचे पैसा वसुली करणारे रायटर यांचे सुद्धा ऑल कॉल रेकॉर्ड तपासावे,
इत्यादी मागण्यासह आझाद मैदान यवतमाळ येथे आमरण उपोषणाला बसले आहे.
चौकट:- सदर मागण्या तात्काळ मंजूर करून संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करून मला न्याय देण्यात यावा. अन्यथा मी आमरण उपोषण उठवणार नाही. माझ्या जीवितास जीवितहानी झाल्यास संबंधित ठाणेदार व पोलीस प्रशासन जबाबदार राहील – शाम धुळे
यावेळी अजय शेंडे जिल्हाध्यक्ष, शाम बनसोड जिल्हाध्यक्ष कामगार सेना, विनोद फुलमाळी, करन भरणे जिल्हा उपाध्यक्ष, कैलास कदम तालुकाध्यक्ष, सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष, विकास मोटघरे, सुमेध पेटकर, नागसेन मनवर ,अक्षय उके, टोपाजी शेळके इत्यादी अनेक यवतमाळ जिल्ह्यातील भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते उपोषण मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित होते.