Home महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!!!

141

सातारा,दि. १४ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथे साताऱ्यातील आयुष संजीवनी हर्बल नुट्रीशन आणि नियती होमिओपॅथिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटर
यांनी मोफत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक आरोग्य शिबीर घेऊन तेथील मुले आणि ग्रामस्थांची केली मोफत तपासणी. या शिबिरात प्रामुख्याने सिद्धार्थ दीपक जाधव (आयुष संजीवनी हर्बल न्यूट्रिशनचे संस्थापक आणि संशोधक), समाधान अनंत भालेराव (सीईओ आयुष संजीवनी हर्बल न्यूट्रिशन) डॉ. प्रगती काझी आणि डॉ. प्रणिता सोलंकी (नियती होमिओपॅथिक क्लिनिक आणि रिसर्च सेंटरच्या संस्थापक) यांनी आनंदाने सहभाग घेतला. किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या. मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषध दिली. महिलांनाही मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली गोडसे मॅडम आणि शिक्षिका योगिता बोराटे मॅडम यांनी आरोग्य शिबिर घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि असाच त्यांचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना व्हावा ही विनंती केली अशाप्रकारे ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबीर अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here