Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे पालक – शिक्षक सभा उत्साहात संपन्न !… ...

महात्मा फुले हायस्कूल येथे पालक – शिक्षक सभा उत्साहात संपन्न !… पालक – शिक्षक संघ व माता – पालक संघ यांची कार्यकारणी जाहीर !…

229

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक – शिक्षक सभा व माता – पालक शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साठी पालक शिक्षक व माता पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
पालक शिक्षक सभेच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, उपाध्यक्षपदी अल्का कैलास भोई व सचिवपदी पालक शिक्षक संघाचे प्रमुख पी डी पाटील व प्रत्येक वर्गातील एक पालक असे १२ सभासद तसेच माता – पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सुरेखा करोसिया, सचिवपदी श्रीमती एम जे महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पालक शिक्षक संघाचे समिती प्रमुख पी डी पाटील यांनी पालक शिक्षक संघाची उद्दिष्टे, शालेय शिस्त, शिष्यवृत्ती, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा विषयी विस्तृत माहिती सांगितली. यानंतर टाटा समूह आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम विद्यार्थ्याला गोल्ड मेडल, द्वितीयाला सिल्वर मेडल व तृतीयाला ब्राँझ मेडल मिळेल प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यानंतर भाषण स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपासपेटी भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक व पालक या दोघांचा वाटा आहे. आपण दोघं मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करूया असे प्रतिपादन केले.
पालक शिक्षक सभेला अल्का भोई, सुरेखा करोसिया, भारती चंडाले, अकिलशहा फकीर, रितेश साने, उषा कुंभार, पुरुषोत्तम जाधव, उरमल मोरे, निर्मला पवार, सुलोचना करोसिया, राकेश महाजन, मनीषा बारेला, नितीन चंडाले, अजय पचेरवाल, बापु भिल, अनिल भोई शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या सहविचार सभेचे सूत्रसंचालन व्ही टी माळी व आभार एस व्ही आढावे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here