Home यवतमाळ दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखा उमरखेड यांना कॉलिटी कंट्रोल म्हणून...

दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखा उमरखेड यांना कॉलिटी कंट्रोल म्हणून “प्रथम पारितोषिक” देऊन गौरविण्यात आले

144

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ९ ऑगस्ट) दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड वाशिम यांची नुकतीच दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

यामध्ये सर्व 12 शाखे मधून प्रत्येक शाखेच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर मुख्य कार्यालयाकडून पारितोषिक जाहीर करण्यात आले.

त्यानुसार दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ली.शाखा उमरखेड यांना कॉलिटी कंट्रोल म्हणून “प्रथम पारितोषिक” वाशिम बँकेच्या अध्यक्षा राठी मॅडम व उपाध्यक्ष पुरुषोत्तमजी चरखा यांच्या हस्ते उमरखेड शाखेचे शाखा सभापती नारायणदासजी भट्टड आणि शाखा व्यवस्थापक शेषराव जाधव यांना पुरस्कार देऊन तसेच शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

यामुळे तालुक्यातून दि. वाशिम अर्बन को-ऑप बँक लि.उमरखेड शाखेवर खातेदार व नागरिकांकडून अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चौकट :- या प्रथम पारितोषीकाचे संपूर्ण श्रेय शाखा सभापती, सर्व शाखा समिती सदस्य तसेच कर्मचारी प्रशांत पाटील, बबन चव्हाण, राजेश खंडेलवाल, सिध्दोधन श्रवले, जगदिश जाधव यांना देण्यात येतो तसेच बँके कडून ग्राहकाचे सेवेकरीता नुसतीच गुगल पे,फोन पे, पेटीएम, भीम ॲप सेवा सुरू करण्यात आली आहे ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटचा वापर करावे अशी विनंती. शाखा व्यवस्थापक शेषराव जाधव यांनी ग्राहकांना केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here