Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन व ‘ऑगस्ट क्रांती दिन’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन व ‘ऑगस्ट क्रांती दिन’ उत्साहात साजरा

72

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग, इतिहास विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी.पाटील, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे, इतिहास विभाग प्रमुख सौ.एस.बी.पाटील तसेच पालक रामलाल बारेला आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.एस.बी.पाटील यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी जयश्री बारेला, आशा बारेला, मेघा बारेला यांनी आदिवासी गीत सादर केले. त्यानंतर भावना कोळी या विद्यार्थिनीने देशभक्तीवर गीत सादर केले. यावेळी स्वरा अनवर्देकर, कोमल चौधरी, मेघा सुळे, पूजा बारेला, सुमित्रा बारेला, जयश्री बारेला, गंगा करणकाळे, मोनाली राजपूत, जयश्री शिंदे तसेच किरण भिल या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपप्राचार्य एस.पी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘आदिवासी संस्कृती अतिशय प्राचीन असून त्यांनी अजूनही आपली संस्कृती टिकून ठेवलेली आहे. त्यांची संस्कृती इतर संस्कृतींपेक्षा वेगळी असून त्यांच्या संस्कृतीत निसर्गाची पूजा केली जाते. या संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब अशाप्रकारे भेदभाव दिसून येत नाही. विद्यार्थ्यांनी आदिवासी साहित्याचे अध्ययन केल्यास त्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडू शकेल.’
या कार्यक्रमाप्रसंगी सौ.एम.टी.शिंदे, विदयार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.पाटील, सहाय्यक विदयार्थी विकास अधिकारी डॉ.आर.आर.पाटील, व्ही.बी.पाटील, बी.एच.देवरे, एस.बी.देवरे, एन.पी.सोनवणे तसेच सौ.एस.पी.पाटील आदि प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली राजपूत हिने केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here