धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात करण्यात आले होते .याप्रसंगी बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी व स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील विविध शाळेतील क्रीडाशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शिक्षक के वाय चौधरी ,चंदन गुरु व्यायाम प्रसारक मंडळाचे श्री दिलीप महाजन ,बंडू नाना सोनार उपस्थित होते. पंच म्हणून आबा धनगर, सुमित महाजन, हरिभाऊ पैलवान व महेश माळी यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री डी एन पाटील , के एस पाटील, आर बी महाले , जितेंद्र ओस्तवाल, ऐ जे जयकारे ,हेमंत माळी ,ए एम सय्यद , फिलिप्स गावित यांनी सहकार्य केले. ऑनलाइन कागदपत्रांच्या संदर्भात क्रीडा समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री आर बी महाले सर यांनी केले. तर आभार श्री के एस पाटील सर यांनी मानले.