Home महाराष्ट्र चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

107

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र विद्यालय चोपडा येथे ०१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पाटील उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे समन्वयक प्रमोद पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गोपाल बडगुजर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
यावेळी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी डीएड प्रथम वर्षाची हर्षाली पाटील हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे वक्ते गोपाल बडगुजर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र व कार्याचा सविस्तर उलगडा केला.
प्रमुख पाहुणे प्रमोद पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यिक म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाविषयी सविस्तर माहिती विशद केली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर आर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीएड द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका काजल महाजन यांनी केले व आभार द्वितीय वर्षाची छात्रा आध्याधिका दीक्षा पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विशाल पाटील तसेच प्राध्यापक प्रियंका पाटील, लिपिक विपुल बाविस्कर व शिपाई सौ सुनंदा बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here