नागभिड :-
तालुक्यातील कृषक विद्यालय कोटगांव येथील विद्यार्थिनी कु. तांजल तुळशिदास धोंगडे हिची जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई बाबा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मरगडे, शिक्षक ठाकरे, पिसे,बारसागडे, मंदे, भागवतकर, सलामे, सुकारे, चंदनखेडे यांना दिले आहे.
तिच्या निवडीबद्दल कोटगाव कोथुळणा तेलिमेंढा येथील नागरिकांनी अभिनंदन केले आहे पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.