कराड : (दि. 20 जुलै, प्रतिनिधी,) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणा संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, सातारा यांच्या वतीने आयोजित केलेल्या
रेड रिबन क्लब जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा 2024-25 मध्ये मुलांच्या गटातून वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचा विद्यार्थी श्री. अथर्व बापूराव भोसले याने पाच किलोमीटर रनिंग करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. सातारा येथे छत्रपती शाहु स्टेडियमवर या स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे आठ विद्यार्थी व 2 विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. मुलांच्या गटातून अथर्व बापूराव भोसले याने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र व गोल्ड मेडल प्राप्त झाले. तसेच त्यांची राज्यस्तरीय रेड रन स्पर्धेत निवड झाली. सहभागींना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे जनरल सेक्रेटरी मा. अल्ताफहुसेन मुल्ला, संस्थेचे विश्वस्त व सदस्य मा. अरुण (काका) पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.