Home महाराष्ट्र संततधार पावसामुळे पडले घर..मुलगी थोडक्यात बचावली..! आता तिन्ही मुलांना घेऊन...

संततधार पावसामुळे पडले घर..मुलगी थोडक्यात बचावली..! आता तिन्ही मुलांना घेऊन राहावे तरी कुठे…? महिलेचा प्रशासनाला सवाल..?

163

 

📡 किशोर बावणे प्रतिनिधी

🛑 साकोली : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे शहरातील सिव्हिल वार्ड येथील मातीचे घर एका बाजूंनी ध्वस्त झाले. यात १२ वीत शिकणारी मुलगी थोडक्यात बचावली. हिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून आईने प्रश्न केला आहे की आता तीन मुलांसह राहावे कुठे.? करीता प्रशासनाने मदतकार्य करून निवास व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

🛑 सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिव्हिल वार्ड आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बाजूला रविवार २१ जुलै सायं. ७ दरम्यान दूर्गा गिरधारी दिघोरे यांचे माती कौलांचे घर अचानक कोसळले. या क्षणी त्यांची १२ वी शिकणारी मुलगी कु. दिक्षा घरी होती. भिंत कोसळून आलमारीला आदळल्याने त्यातील काच फुटून हिच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली असून या घटनेत ती थोडक्यात बचावली आहे. महिलेचे पती गिरीधर दिघोरे हे मृतक असून आता मोठी मुलगी दिपीका, दिक्षा व मुलगा भूषण दिघोरे यांना घेऊन आता राहायचे कुठे हा प्रश्न महिलेने उपस्थित केला असून प्रशासनाने शैक्षणिक मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी राहण्याची व्यवस्था व मदतकार्य करावे अशी मागणी घरमालक दूर्गा गिरधारी दिघोरे यांनी केली आहे. यावेळी पडझड घराची पाहणी करतांना किशोर बावणे, निलेश डुंभरे निलेश सिंगोर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here