Home चंद्रपूर अतिवृष्टी नुकसानीची माहिती विमा कंपनी वा सरकारला सादर करण्यासाठी किमान एक आठवड्यांची...

अतिवृष्टी नुकसानीची माहिती विमा कंपनी वा सरकारला सादर करण्यासाठी किमान एक आठवड्यांची मुदत देण्यात यावी-ग्राहक पंचायत*

89

 

चंद्रपूर-तीन-चार दिवसांपूर्वी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू विगत तिन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उशिरा वरुणराजाने हाजरी लावल्याने पुसल्या गेले की नाही तर नवीन समस्या आ वासून पुढे ठाकली आणि बळीराजाचे स्वप्नच पाण्यात वाहून गेल्याने साश्रू नयनांनी रडत बसायचे का अशा द्विधा मनःस्थितीत आमचा बळीराजा अडकला आहे.

शासन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देण्यास सांगितले असून तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,तर विमा कंपन्यांनी ४८तासाचे आंत नुकसानीची माहिती एक नवीन ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे संपूर्ण माहिती भरुन सोबत एका फोटो वा व्हिडिओसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अतीपावसांत हे शक्य तरी आहे का?

आमचा बळीराजा प्रगत होतो आहे ,येणारे बदल स्विकारतोच आहे , शेतकऱ्यांना आँनलाईन शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागली ती शेतकरी करु लागला , आँनलाईन नोंदणी करुन विविध लाभ व योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करु लागला, पण तरीही तलाठी व कृषी अधिकारी यांचेकडे चकरा मारणे कमी होत नव्हते त्यामुळे आँनलाईन सर्व कागदपत्रे मिळण्याची सोय उपलब्ध झाली आणि त्यापासून दिलासा मिळाला,आजपर्यंत पीकपेऱ्याची नोंद तलाठी करायचे, शासननिर्णय झाला , जमले नाही जमले तरी कुणाच्या तरी मदतीने शेतकरी स्वतः पीकपेऱ्याची नोंद करु लागला , शेतकरी सोसायटी च्या माध्यमातून पीक कर्ज घेत होते , सोसायटी शेतकऱ्यांचा विमा काढायच्या , शासननिर्णय झाला, नाममात्र १₹त विमा काढण्याची सोय उपलब्ध झाली, शेतकऱ्यांनी हाही बदल स्विकारला मागील वर्षी आपले सरकार व सेतू केंद्रातून विमा काढण्यासाठी रात्रीचा दिवस केला , परंतू काही लोकांना विम्याचा लाभ मिळाला तर बरेचशे शेतकरी या लाभापासून वंचित राहिले ,कारण काय तर म्हणे, नुकसान झाल्याची रितसर तक्रार, विमा कंपनी, कृषी विभाग वा महसूल प्रशासनाकडे केली गेली नाही, वास्तविक ही माहिती कुणी शेतकऱ्यांना पुरवलीच नव्हती , त्यामुळे कुणी गांभीर्याने नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रार केली नव्हती परिणामी लाभ मिळवता आला नाही ,हा प्रश्न राजकीय नेतेमंडळींपैकी कुणी गांभीर्याने लावून धरला नाही, बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहिले, राजकीय विरोधकांनी उशिरा शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न म्हणून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जावा व तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी केली.नंतर आमचे म्हणणे कुणी ऐकुणच घेत नसल्याचा कांगावा केला व अजूनही करीतच आहेत.

यावर्षी पीकविमा काढण्यासाठी बळीराजा पुढे सरसावला तरीही काही शेतकरी विमा काढू शकले नव्हते,अंतिम मुदत संपताना मुदतवाढ मिळावी यांची मागणी झाली , मुदतवाढ मिळाली ,पण यादरम्यान मागील तिन चार दिवसांत अतिवृष्टी झाली आणि शेतकरी अडचणीत सापडला, त्याची मेहनत व पैसा पाण्यात वाहून गेला, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी सुरू करताच व शासनाच्या वतीने नुकसानीची माहिती देण्याची मागणी होताच विमा कंपन्यांनी ४८तासाचे आंत नुकसानीची माहिती ॲपद्वारे सादर करण्याचे फर्मान काढले आहे.

*खरेतर हा तुघलकी निर्णय आहे* , तरीही आमचा बळीराजा हाही निर्णय व बदल स्विकारेल व नुकसानीची माहिती सादर करेलच परंतू ४८तासांची मर्यादा हा तर आमच्या बळीराजाच्या अधिकारांवर घणाघात असून पुरपरिस्थितीचा विचार करता किमान २४तासांहून अधिक काळ लोटून गेला आहे, आणि तरीही काही ठिकाणी शेतकरी बांधावर पोहोचू शकत नाही ,व ही ॲपद्वारे माहिती ऐनवेळी कशी सादर करणार?त्यामुळे ॲपबाबत माहिती मिळवणे व त्यानुसार माहिती सादर करण्यासाठी वेळ लागणार आहे परिणामी या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आधीच पावसाच्या घणाघाताने पुरता खचलेल्या शेतकऱ्यांना यांची माहिती सादर करण्यासाठी किमान एक आठवड्यांची मुदत दिली जावी ,अशी बहुतांश शेतकऱ्यांची मागणी असून त्या आशयाची मागणी शेतकऱ्यांनी ग्राहक पंचायत मूल यांचेकडे केली असून शेतकऱ्यांच्या या मागणीचा सहानुभूतीने विचार करावा व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानीची माहिती सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत द्यावी अशी मागणी तहसीलदार यांचे माध्यमातून महाराष्ट्र शासनाला, ग्राहक पंचायत मूल शाखेतर्फे करण्यात आली आहे.
शासन याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घेईल अशी आशा दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here