Home यवतमाळ जगदंब देवी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणी ...

जगदंब देवी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणी (सा.बा उपविभाग कार्यालय समोरच रस्त्यात खड्डे)

165

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक २० जुलै) नागपूर तुळजापूर हायवे रोड उमरखेड मधून जात असताना जगदंबा देवी पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग समोरील, छ. संभाजी महाराज गार्डन समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समोरील ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झालेली आहे.

पण त्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचे जाणून-बुजून दुर्लक्ष करून रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालत आहेत.

या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झालेली दिसत असून सा. बां उप विभाग हे गाढ झोपेत असल्याचे सोंग करत आहे.
आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व असे झाल्यास संबंधित सा.बा उपविभाग जबाबदार राहील असे उमरखेडकर नागरिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

चौकट :- जगदंबा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्त्यांमध्ये अनेक मोठमोठे खड्डे पडले असून याकडे सा.बा विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.
सदर रस्ताच्या दुरुस्ती ८ दिवसात न झाल्यास भिम टायगर सेनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here