Home चंद्रपूर गोसीखुर्द प्रकल्पातील कालवा फुटून पन्नास एकर शेतजमीन पाण्याखाली! भालेश्र्वर ,अर्हेर- नवरगाव...

गोसीखुर्द प्रकल्पातील कालवा फुटून पन्नास एकर शेतजमीन पाण्याखाली! भालेश्र्वर ,अर्हेर- नवरगाव शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान तोंडचे घास क्षणात वाहून गेले

1243

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- गोसीखुर्द या राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे मुख्य कालव्यापासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहचविल्या जाते. भालेश्र्वर येथून जाणारा कालव्याला भगदाड पडून फुटल्यामुळे अर्हेर- नवरगाव, भालेश्र्वर शेतकऱ्याच्या शेत शिवारात पाणीच पाणी झाले.
आज गुरुवार सकाळी ही घटना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे तोंडाचे पाणीच पळाले आहे. दरम्यान, कालव्यातून मोठ्या विसर्गाने पाणी वाहत असल्यामुळे
पन्नास एकरातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तर कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी शेतात वाहून जात आहे. शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित राहावे लागणार असून अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीसह जिल्हापरिषदेचे पाटबंधारे विभाग आणि शासनाच्या खरपट्टी विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करीत आहे.
____________________

रोवणीचा काम पूर्ण होत असताना नहर फुटून आमच्या शेतात पाणी आले. आमच्या तोंडचे घास आमच्या डोळ्यासमोर एका क्षणात वाहून गेले. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. – वामन उरकुडे शेतकरी व इतर शेतकरी
___________________

कालवा फुटला असल्याचे कळताच मंडळ अधिकारी व तलाठी यांना माहिती देऊन लवकरात लवकर बंदोबस्त करा असे सांगितले. तसेच शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि येथील शेतकऱ्यांची मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. – क्रीष्णा दिघोरे पोलिस पाटील – भालेश्र्वर
_____________________

अतिवृष्टीमुळे कॅनल फुटले. आमच्या कॅनलचा पाणी नाही.आम्ही लिमिटेड कॅनल मधून पाणी सोडतो. दोन दिवसानंतर पोकलॅंड येत असून माती टाकून पाणी अडवू. अतिवृष्टी असल्यामुळे तलाठी व महसूल विभगामार्फत चौकशी बसवून मदतीची तयारी करत असतील तर आमच्याकडून सुद्धा चौकशीस तयारी असून आमच्या कडून जेवढी मदत होईल तेवढी संबधित शेतकऱ्यास मदत करू – हितेश गोबाडे अभियंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here