प्रतिनिधी –
जामनेर – येथील रहिवासी महात्मा जोतीराव फुले सेवाभावी संस्था अध्यक्ष पवन भाऊ माळी यांच्या आजी धोंडाबाई किसन बावस्कर यांचे दि. ५ जुलै, २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांच्या दशक्रिया व गंधमुक्ती विधी एरंडोल येथील सत्यशोधक विधिकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते पार पडला.
आजींच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये लिंब, चिंच, पिंपळ, वड, गुलमोहर अशा झाडांचा समावेश आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यात १,००० रू देणगी दिली जामनेर शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विधी केल्याने उपस्थित समाज बांधवांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमास सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश दादा वराडे, मा मुख्याध्यापक कडू बावस्कर, संदिप रोकडे सर, बाळूभाऊ महाजन, डॉ लक्ष्मण माळी, वसंत माळी, विठ्ठल माळी, संजू माळी, रवि झाल्टे, नरेश माळी, विनायक माळी, सुधाकर माळी, राजू माळी उपस्थित होते.
सत्यशोधक विधी करण्याची प्रेरणा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, विधिकर्ते भगवान रोकडे, शिवदास महाजन, जळगाव जिल्हा समन्वयक पी डी पाटील सर, विजय लुल्हे सर, जामनेर येथील सत्यशोधक प्रचारक रमेश दादा वराडे यांच्या कडून मिळाली.