Home महाराष्ट्र अंबोडा येथिल जुगाराला पोलिसाचे अभय महागांव-किशोर राऊत

अंबोडा येथिल जुगाराला पोलिसाचे अभय महागांव-किशोर राऊत

155

तालुक्यातील अंबोडा येथे पोलिसाच्या वरदहस्ताने जूगाराचा व्यवसाय सुरु आहे या व्यवसायातुन दररोज हजारो रुपयाची उलाढाल होत आहे या व्यवसायाला पोलिसाचे अभय असुन पोलिसांना जुगार चालक दरमाहे आर्थिक हप्ता देत असल्याने पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हा व्यवसाय अंबोडा या गावात राजरोसपणे सुरु असल्याने या व्यवसायातुन जुगार चालकाला हजारो रुपये मिळत असल्याने जुगार चालकानी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे पोलिस स्टेशन‌ च्या अगदी अंबोडा हे गांव असुनही पोलिस या जुगाराला पाठबळ देत आहेत या व्यवसयामुळे अनेक लोकाचे संसार उघड्यावर आले आहे या व्यवसायाकडे शाळकरी मुलासह कर्मचारी वळले असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली आहे हा जुगाराचा व्यवसाय जनतेला गंठवणारा असल्याने या व्यवसायात अनेक जन बरबाद झाले आहे सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना आर्थिक हप्ता मिळत असल्याने पोलिस जुगार चालकास मालक, दादा,भाऊ,अशाप्रकारच्या आदरातिथ्य नावाने संबोधत असल्याने जुगार चालकांनी हा व्यवसाय प्रतिष्ठेचा करुन या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे सदर व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याने पोलिस या व्यवसायापुढे दूबळे ठरले आहे पोलिसाची जुगाराचा चालत असलेला व्यवसाय बंद करण्यास धाडस होत नाही पोलिस जुगार चालकापुढे बाहुले होऊन निमुटपणे या व्यवसायाकडे पाहत असुन पोलिसाचे जुगार चालकापुढे हात टेकले आहे या व्यवसायात अनेक जन भागिदार असुन पोलिसही भागिदार असल्यागत परीस्थिती‌ वाटत आहे पोलिस कमकुवत व अपंगासारखे वाटत आसल्याने यापुर्वीसुध्दा याच अंबोडा गावातिल जुगार चालकानी पोलिसाना मारले‌ होते त्यावेळी पोलिसाची छि,थी,झाली होती परंतू पोलिसाना त्या मारलेल्या घटनेचे स्मरण राहिले नसल्याने पोलिस या जुगारापुढे पंगू ठरले आहे नविन ठाणेदार आले असतानासुध्दा त्यांचा सुतरामही‌ या व्यवसायावर प्रभाव पडला नसुन
जुगार वाढविण्यास जुगार चालकानी जराही कमतरता ठेवली नाही या व्यवसायामळे अनेक लोकाचे संसार उध्वस्त झाले आहे पोलिसांचे गरीबांच्या समस्येकडे लक्ष नसुन जुगारातुन मिळणाऱ्या वरकमाई कडे जास्त लक्ष दिसुन येत आहे अशा अवैद्य व्यवसायामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन कधी‌ शांतता भंग होईल हे सांगता‌ येत नाही तेव्हा जिल्हा पोलिस आधिक्षक साहेबांनी चालत असलेल्या जुगारावर घाड टाकुन अंबोडा येथिल चालत असलेला जूगाराचा व्यवसाय बंद करुन या व्यवसायाच्या आहारी गेलेल्या लोकांची सुटका करावी अशी जनतेची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here