Home यवतमाळ फोर व्हीलर चालक मालकाने जर आत्महत्या केली तर त्याला पोलीस जबाबदार राहतील...

फोर व्हीलर चालक मालकाने जर आत्महत्या केली तर त्याला पोलीस जबाबदार राहतील – दादासाहेब शेळके

337

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 11जुलै) तालुक्यातील ढाणकी जिल्हा यवतमाळ भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके हे विदर्भ दौऱ्यात असताना भिम टायगर सेनेचे उपजिल्हाप्रमुख करण भरणे सर यांच्या माध्यमातून ढाणकी शहरातील फोर व्हीलर चालक-मालक संघटनेने दादासाहेब शेळके यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा केला जंगी सत्कार केला.

विविध विषयावर चर्चा करून शेवटी फोर व्हीलर चालक मालकावर पोलीस कडुन होत असलेल्या अन्यायकारक आर्थिक लूट होत असल्याचे सांगून दादासाहेब शेळके यांच्या समोर स्वतःची व्यथा मांडून म्हणले की, आम्ही कर्ज काढून वाहन विकत घेतली आहेत, आमच्याने वाहनांचे हप्ते वेळेवर भरणे सुद्धा होत नाही.

पण पोलीस आम्हाला नियमांचा धाक दाखवून आमच्या सर्वांकडून दर हप्त्याला हप्ता च्या नावाखाली मोठी रक्कम घेत आहेत.

त्यामुळे पोलिसाच्या हप्त्यामुळे आमचा बँकेचा हप्ता भरने शक्य होत नाही. त्यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडले असून उद्या आमची गाडी सुद्धा बँक वाले ओढून नेऊ शकतात.
त्यामुळे आम्हाला जीव देण्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले.

यावेळी दादासाहेब शेळके यानी फोर व्हीलर चालक-मालक संघटनेच्या कार्यकर्त्याला योग्य मार्गदर्शन करताना सांगितले जर उद्या एखाद्या चालक-मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली तर त्याला पोलीस जबाबदार राहतील व पोलिसाच्या अत्याचारा संदर्भात लवकरच चालक-मालक संघटनेच्या कार्यकर्त्यां सोबत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेणार असून फोर व्हीलर चालत मालक संघटनेच्या पाठीमागे भिम टायगर सेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे दादासाहेब शेळके यांनी असे आश्वासन दिले.

यावेळी भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख राष्ट्रपालदादा सावतकर, सिंघम ढगे, उमरखेड तालुकाप्रमुख कैलासदादा कदम, शहरप्रमुख सिद्धूभाऊ दिवेकर, कुणाल भरणे व फोर व्हीलर चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here