✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १० जुलै) पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या सुकळी (जं) येथील महिला सरपंच प्रणाली मस्के यांच्या नावाने असलेली डिजिटल सिग्रेचर (डीएसी) उपसरपंच शिवाजी रावते यांनी स्वतःच्या मोवाईलला जोडून ग्रामपंचायतीला येथील कार्यरत ग्रामसेवक दीपक भगत यांच्यासोबत संगणमत करून व – सरपंच महिलेची बनावट सही करून बँकेतून पैसे काढले असल्याबाचतची तक्रार उमरखेड पोलिसात सरपंच महिलेकडून दाखल करण्यात आली असून या तक्रारीमुळे उमरखेड तालुक्यात – एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील येथील २०२३ सुकळी (ज) २०२४ या वर्षात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी प्रवर्गातून थेट महिला सरपंच म्हणून मस्के या निवडून आल्या व त्यांनी सरपंच म्हणून पदभार देखील स्वीकारला पदभार स्वीकारल्या नंतर ग्रामपंचायतीच्या आर्थीक व्यवहाराच्या खात्यात नियमानुसार बदल झाला.
ग्रामविकासासाठी आलेला निधी उपसरपंच शिवाजी रावते याने स्वतःच्या मोबाईलवर ओटीपी घेऊन काढून घेतला तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या फाईलवर सरपंच यांच्या बनावट सहह्या मारल्या व तसेच महात्मा गांधी ग्रामीन रोजगार हमी योजनेमध्ये सरपंचाच्या बनावट सह्या करून भ्रष्टाचार केला.
हा सर्व प्रकार सुकळी ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर कनचाले, अरबिंद बडेराव, राहुल चानखेडे, यांनी सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिला त्यामुळे सुकळी (ज.) वेथील सरपंच प्रणाली मस्के यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी निवेदन देऊन कळविले तसेच बनावट सह्या करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे शासनाची
फसवणूक झाली असून याबाबतीत सखोल चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्यात याची यासाठी दिनांक १ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), यवतमाळ उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या तसेच उपसरपंच शिवाजी रावते यांची पत्नी रंजना रावते यांच्या नावे घरकुल योजनेचा लाभ माझ्या बनावट सहीने घेऊन त्या पोटी संगणमताने दोन हप्ते उचलले ही हप्त्याची रकम उचलण्यासाठी जिओ ट्रेकिंग अधिकारी व इतर अधिकारी यांना हाताशी धरून बनावट सह्यांचे आधारे शासन निधी हडपविला असून संगणमताने झालेल्या या प्रकारामुळे सुकळी (जं) येथील सरपंचाने थेट उमरखेड पोलिसात उपसरपंच शिवाजी रावते ग्रामसेवक दीपक भगत व उपसरपंच यांच्या पत्नी रंजना रावते, यांच्या विरोधात उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सुकळी (जं) येथील या प्रकरणाने संबंध तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.