Home Breaking News सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

102

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : धरणगाव नगर परिषदेचे आस्थापना विभाग प्रमुख योगराज तळेराव यांच्या वाढदिवस व सेवानिवृत्तीचे औचित्य साधून, गोदावरी फाउंडेशन जळगाव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जि.प.जीवन शिक्षण विद्यालय येथे गरजू, गोरगरीब सामान्य जनतेसाठी मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सौ.लक्ष्मीबाई तळेराव, जगन्नाथ तळेराव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, माजी नगराध्यक्ष डॉ.व्ही आर तिवारी, सुरेश चौधरी, निलेश चौधरी यांसह ॲड.हरिहर पाटील, राजू बाविस्कर, संदीप फुलझाडे, महेंद्र मराठे आदी मान्यवरांनी उपस्थिती दिली.
महाआरोग्य शिबिराचा धरणगाव शहर व परिसरातील २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात टुडे इको, ईसीजी, कार्डिओग्राम, रक्तदाब तपासणी, मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, कान, नाक, घसा, डोळ्यांचे आजार, कानाचा पडदा, टॉन्सिल, नाकाचे हाड, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरडेपणा शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, गर्भाशयाचा ट्यूमर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या गाठी, अंडाशयाच्या गाठी, सांधेदुखी, फॅक्चर, संधिवात, व्यंग, मासपेशी, त्वचेचे मुरूम, चेहऱ्यावरील डाग, खाज, नायटा, एलर्जी, केस गळणे, नखांचे विकार, लैंगिक समस्या, कुष्ठरोग, यांसह एन्जोग्रोफी, इंजोप्लास्टी, हृदयरोग या सर्व विकारांवर मोफत उपचार व मार्गदर्शन झाले. महाआरोग्य शिबिरात गोदावरी फाउंडेशन समूहाचे सर्व पदाधिकारी, उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महाआरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी मनसे तालुकाध्यक्ष हेमंत महाजन, विद्यार्थी सेनेचे भूषण तळेराव, शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, उपतालुकाध्यक्ष कृष्णा पाटील चित्रपट सेनेचे समाधान महाजन, मनसे नेते रवी महाजन, तुषार तळेराव, हेमराज तळेराव‌, गोकुळ‌भाऊ व रूपेश‌भाऊ‌ मित्र‌ परीवार यांच्यासह मनसे‌ सैनिकांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here