वरूड तालुका प्रतिनिधी /
वरूड तालुक्यात बऱ्याच काळापासून खेडवासियांची प्रमुख मागणी असलेले राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावे ही मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे निकाली निघाली असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेनिवर्धन करून मान्यता मिळाल्याने आ देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे. त्यामुळे राजुरा बाजार आरोग्य केंद्रातील गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार होण्यास मदत होणार आहे.
राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील गाडेगाव वाडेगाव काटी वघाळ वंडली राजुरा बाजार हातुर्णा नांदगाव अमडापूर डवरगावं वडाळा चिंचरगव्हाण मोरचून्द पवणी देऊतवाडा खानापूर इसापूर उदापूर मेंढी फत्तेपूर ही गावे येत असल्याने ते गैरसोयीचे होते. ही बाब आमदार देवेंद्र भुयार यांच्या लक्षात आल्यानंतर आ. देवेंद्र भुयार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेनिवर्धन करण्यास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ. देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा करून केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची राज्य शासनाकडून गंभीरपणे दखल घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीचा विचार करत करत कार्यवाही करण्यात आली असून आरोग्य विभागने काढलेल्या परिपत्रकात राजुरा बाजार येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे.
वरूड तालुक्यातील राजुरा बाजार मोठ्या लोकसंख्येचे गाव असून इतर आसपासची २० गावे राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गात येतात. भौगोलिक दृष्ट्या राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र हे हजारो नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी अपुरे पडत असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. आमदर देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आता संबंधित गावांमधील लोकांचा हा त्रास वाचला असून आरोग्य सुविधा गरजू लोकांपर्यंत जलद गतीने पोहचण्यास देखील मोठी मदत होणार असल्याचे यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
वरूड तालुक्यातील ग्राम राजुरा बाजार येथे राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजुर करून आणले असून आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकारी यांच्यासह रूग्णालय बांधकाम करण्या बाबत जागेची पाहणी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राजुरा बाजार ग्रामीण रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या गाडेगाव वाडेगाव काटी वघाळ वंडली राजुरा बाजार हातुर्णा नांदगाव अमडापूर डवरगावं वडाळा चिंचरगव्हाण मोरचून्द पवणी देऊतवाडा खानापूर इसापूर उदापूर मेंढी फत्तेपूर या सर्व गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवे साठी स्वतंत्र ३० बेड ग्रामीण रुग्णालय हे विशेष बाब म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणल्याबद्दल संपूर्ण गावातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.