


उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे, अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक, आणि ओबीसी या सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असून यातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरविण्याचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तसेच पान पिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून राज्याच्या अर्थसंकल्पातून शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मिळालं आहे.
शेतकरी, आदिवासी, महिला, युवक, आरोग्य, उद्योग, पर्यटन, मागास वर्गाला या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा करण्यात आलेला प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे. अशाप्रकारे सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्यातील जनतेच्या पंखांना बळ देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे.












