धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तदनंतर लोककल्याणकारी राजा छत्रपती राजश्री शाहूजी महाराज यांची १५० वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय दिन समारोहाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील उपशिक्षक व्ही टी माळी यांनी लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विशद केले. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी रयतेचे दुःख जाणणारा राजा – मोठ्या दिलाचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय असे प्रतिपादन माळी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार पी डी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.