महागाव -तालुक्यातिल हिवरा सं येथिल पांदन रस्त्याचे काम करण्यासाठी ३०हजार रुपयाची लाच मागितली होती या बाबतीत हिवरा येथिल पांडुरंग आंडगे यांना रखडलेला पांदन रस्ता मंजूर करण्यासाठी तहसिल येथिल कनिष्ठ लिपिक प्रविणकुमार महादेव पोहरकर यांनी
३०हजार रुपयाची लाच
मागितली होती या
संदर्भात पांडुरंग आडगे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांचेकडे तक्रार दिली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी सापळा रचुन दि.२६-६-२०२४ ला सायंकाळी ५-००वाजताचे दरम्यान पांडुरंग आंडगे यांचेकडून ३०हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले असुन पुढील चौकशी करण्यासाठी लिपिक प्रविणकुमार महादेव पोहरकर यांना ताब्यात घेवुन विश्रामगृह महागांव येथे चौकशी सुरू करण्यात आली विशेष बाब म्हणजे याच लाचखोर लिपिक यांनी मागिल एक महीण्यापर्वी चार पत्रकारावर आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी खोटी तक्रार देवून पत्रकारावर खंडणीचा गुन्हा नोंद करावयास लावला होता