Home Breaking News सामाजिक समतेचा विचार म्हणजेच राजर्षी शाहू महाराज* – गणेशसिंह सूर्यवंशी. पी.आर.हायस्कूलमध्ये...

सामाजिक समतेचा विचार म्हणजेच राजर्षी शाहू महाराज* – गणेशसिंह सूर्यवंशी. पी.आर.हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

254

 

धरणगाव – राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक उद्दिष्टे साध्य करणारे, जनतेविषयी कणव असलेले लोकराजे होते. त्यांनी आपल्या संस्थानात सर्वं प्रथम आरक्षण लागू करून समतेचा विचार पेरला. ते बहुजनांसाठी शाळा,वसतिगृह काढले .राधानगरी धरण बांधलं. राज्यात दुग्धविकास केला. राजा असून ऋषी सारखं विरक्त जीवन जगले वाराणशी येथे ब्राम्हणेतर पाठवून त्यांच्या करवी पौराहित्य केले. या त्यांच्या कार्यामुळेच सामाजिक समतेचा विचार म्हणजेच राजर्षी शाहू महाराज ही संकल्पना रूढ झाली, अशी अभ्यासपूर्ण मांडणी शाळेचे शिक्षक, व्याख्याते गणेशसिंह सूर्यवंशी यांनी पी.आर.हायस्कूल मध्ये शाहू महाराज जयंतीनिमित्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. तर मंचावर उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ व पर्यवेक्षक कैलास वाघ हे होते. या मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकातून छत्रपती शाहूंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे.धनगर यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक एस.डी.मोरे, वंदना सोनवणे, व्ही.एच.चौधरी , डी.एच.कोळी , एस.के.बेलदार, आर.एल.पाटील, पी.डी.माळी, नवनीत सपकाळे, एस.पी.सोनार, डॉ. वैशाली गालापुरे, वाय.ए.पाटील, जी.पी.चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here