✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड :- (दि. 24 जून) पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना मिळालेल्या गोपनिय माहीती आधारे दि. २४/०६/२०२४ रोजी चे मध्यरात्री ०१.०० वा. एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन क. एम.एच. २६-सी.एच. ०२६४ हे शासन प्रतिबंधीत गुटखा माल अवैधरित्या घेवुन जात आहे.
या गोपनिय खबरेवरुन पोलीस स्टेशन पोफाळी चे ठाणेदार व त्यांच्या पथकाने उमरखेड पुसद रोडवर गंगणमाळ फाटयावर सापळा लावला असता एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेड वरुन पुसद च्या दिशेने येतांना दिसली.
सदर वाहनास हात दाखवुन थांबविले असता वाहन दूरच थांबले व वाहनातील चालक पोलीसांना पाहुन वाहन जागेवरच सोडुन पोबारा झाला. पोलीसांनी दोन प्रतिष्ठीत पंच बोलावुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामधे शासन प्रतिबंधीत केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुददेमाल दिसुन आला.
सदर मालाची मोजनी केली असता मोठे पांढरे रंगाचे १० कट्टे ज्याचे आतमध्ये विमल कंपनीचे २६०० पॉकीट प्रत्येकी अं. किंमत ४००/- रुपये प्रमाणे १०,४०,०००/- रुपये चा मुद्देमाल. मोठे खाकी रंगाचे ०२ कट्टे ज्याचे आतमध्ये विमल कंपनिचे ४४० पॉकीट प्रत्येकी अं. किंमत ४५०/- रुपये प्रमाणे १,९८,०००/- रुपये चा मुद्देमाल.
मोठे पांढरे रंगाच ०१ कट्टा ज्याचे आतमध्ये राजनिवास कंपनिचे २५० पॉकीट प्रत्येकी अं. किंमत १५०/- रुपये प्रमाणे ३७,५००/- रुपये चा मुद्देमाल. मोठे खाकी रंगाचे ०३ कट्टे ज्याचे आतमध्ये वि १ कंपनिचे १५६० पॉकीट प्रत्येकी अं. किंमत १००/- रुपये प्रमाणे१,५६,००/- रुपये चा मुद्देमाल.
मोठे खाकी रंगाचे ०१ कट्टे ज्याचे आतमध्ये विमल ब्लॅक कंपनिचे २००पॉकीट प्रत्येकी अं. किंमत १५०/- रुपये प्रमाणे ३०,०००/- रुपये चा मुद्देमाल व
एक महिंद्रा कंपनिची बोलेरो गाडी ज्याचा वाहन क्र.एम.एच.२६ सि.एच.०२६४ ज्याची अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये चा मुद्देमाल असा एकुण २०,६१,५००/- रु चा मुद्देमाल गाडीसह मिळुन आला.
सदरचा मुददेमाल ताब्यात घेवुन आरोपी वाहन चालक नामे शेख अयाज शेख वहाब, वय ३५ वर्षे, रा. गढी वार्ड पुसद याचे विरुध्द पोस्टे पोफाळी येथे अप. क
१७०/२०२४ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल कोठुन आणला व त्याचा मुळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई डॉ. पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ,पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहा. पोलीस निरीक्षक पंकज व्ही दाभाडे ठाणेदार पोफाळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश बोंबले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे, महीला पोलीस कॉन्स्टेबल निलम श्रीनिवास यांनी पार पाडली.